Love · कविता

ऋतुचक्र

निष्पर्ण फांद्यांना जशा, वसंतात नव्या पालव्या फुटतात… तुझ्या आठवणींचे क्षण मला, तसेच नव्याने भेटतात… ग्रीष्मातील उन्हाचे, जसे चटके सर्वांगी… तुझ्या विरहात होरपळणार, माझ मन ते अभागी…. मग वर्षा येते, अन बेधुंद तो बरसतो…. माझ्या नयनातील पाऊस , तुझ्याचसाठी तरसतो… शरदात त्याला, कुठेतरी मग उसंत असते…. कस जगाव तुझ्याविना, माझ्यासाठी एवढीच एक खंत असते…. हेमंत आणि… Continue reading ऋतुचक्र

लेख

भूतकाळ…

भूतकाळ… खरंच भूताप्रमाणे असतो…. आपल्याला दिशा देण्याची किवा आपली दशा करण्याची ताकद त्यामध्ये असते… जो भूतकाळ आपले वर्तमान आणि भविष्य बिघडवू शकतो तो कितीही हवासा असेल तरी काय कामाचा? आणि तोच हवा असेल तर मग त्यानुसारच वर्तमान ठेवावे आणि भविष्य ठरवावे…. माणसाला सगळंच मनाप्रमाणे मिळत नाही….आणि नाहीच मिळू शकत… परंतु काही गोष्टी मिळविण्यासाठी अथवा टिकविण्यासाठी… Continue reading भूतकाळ…

चारोळ्या

एक भावना….

नकळत तू पकडलेला हात, असाच असावा हाती…. अगदी माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत… किमान एवढीच एक भावना, माझ्या मनाची, पोहोचावी तुझ्या मनापर्यंत…. – अमर ढेंबरे

कविता

तुझ्याविना…

तुझ्याविना… एका एका पावलाच अंतरही, मैलाप्रमाणे भासत आहे… तुझ्याविना… जाणवतोय युगासारखा एक एक क्षण, अस्वस्थ गात्रे आणि अत्यवस्थ माझ मन… असंख्यांनी सजलेले रस्तेही तुझ्याविना सुने सुने, जळणार माझ मन अन होरपळलेली माझी स्वप्ने… खरच…… ओळखीचं या जगात आता काहीच भासेना… तुझ्याविना…. श्वासानीही का मग स्पंदाव, मनानेही आता कशास भुलाव….? तुझ्याशिवाय, नयनांनी आता कुणा पहाव? आसवांनी… Continue reading तुझ्याविना…