मनात खूप काही असलं तरी….

मनात खूप काही असलं तरी सारच बोलता येत नाही…कारण बऱ्याच वेळा सर्वच भावना व्यक्त करण्याच्या नादात समोरच्याचं मन दुखावलं जाऊ शकत…

एक मात्र खर कोणी आपलं मन दुखावलं तरी चालेल….
आपण मात्र पुरेपूर प्रयत्न करायचा समोरच्याच मन न दुखावण्याचा….

खरतर कोणामुळे आपल मन दुखवल जातंय तर जाऊदेत…परंतु आपल्यामुळे कोणाच मन दुखावता कामा नये…

प्रत्येकाला मनाप्रमाणे जगण्याचा हक्क आहेच…. आपण तो कधीही हिरावू नये…ज्यावेळी तुमचा अधिकार हिरावला जातो त्यावेळीच तुम्हाला त्याची जाणीव होते…

मनात वादळे सामावून हसण्याची कला शिकायलाच हवी…. म्हणजेच, आतून कितीही ओलावा असला तरी वरून दगडाप्रमाणे राहता यायला हव…आणि समजा तेही नाहीच जमलं, तर शांतपणे निघून जाताही यायला हवं….

बहुधा अस असायला हव की नाही हे माहित नाही…. परंतु अनुभव तर हेच सांगतो…

© अमर ढेंबरे

हास्य आणि आनद

हास्य आणि आनद यात कमालीचा फरक आहे.
माणूस हसतोय म्हणजे तो आनंदी असेलच अस नाही. परंतु प्रत्येक आनंदी माणूस हसेल जरूर.….

हास्य दर्शविता येऊ शकत परंतु आनद दर्शविण्याची गरज नसते, तो आपोआप चेहऱ्यावर किवां देहबोलीतून व्यक्त होतो.

हास्याचे अनेक प्रकार असू शकतात, परंतु आनंदाचा कोणताही प्रकार नसावा…. हास्य जस वरवरच असू शकतो तस आनंदच नाही…तो आतूनच असतो….’म्हणूनच आनद हा निरागस असतो….

आनंद हा आनंद असतो…
आनद हा मनापासून हसण्याचा एक छंद असतो…

बरोबर ना ??

– अमर ढेंबरे

भूतकाळ…

भूतकाळ…
खरंच भूताप्रमाणे असतो….
आपल्याला दिशा देण्याची किवा आपली दशा करण्याची ताकद त्यामध्ये असते…

जो भूतकाळ आपले वर्तमान आणि भविष्य बिघडवू शकतो तो कितीही हवासा असेल तरी काय कामाचा?
आणि तोच हवा असेल तर मग त्यानुसारच वर्तमान ठेवावे आणि भविष्य ठरवावे….

माणसाला सगळंच मनाप्रमाणे मिळत नाही….आणि नाहीच मिळू शकत…
परंतु काही गोष्टी मिळविण्यासाठी अथवा टिकविण्यासाठी काही गोष्टी टाळता यायलाच हव्या….
किंबहुना…. आपल्याला नक्की काय हवं के कळायला हव…. म्हणजे आयुष्याला योग्य दिशा मिळू शकेल…आपल्याही आणि आपल्यावर भिस्त असलेल्या दुसऱ्यांच्याही….

खरय ना….

– अमर ढेंबरे