जबाबदार

फुलांना शोषत तर फुलपाखरूही,
वेडा भ्रमर तो आवाज करतो…

आपणही कसे ना,
फक्त त्यालाच जबाबदार धरतो…

© अमर

स्वप्ने तुटण्याचे भास झाले की….

कधी स्वप्ने तुटण्याचे भास झाले की,
मनात भावनांचा गलका होतो…

शांतच राहायचं असत मला,
पण माझा चेहरा,
नेमका त्याचवेळी बोलका होतो…

– अमर ढेंबरे