ऋतुचक्र

निष्पर्ण फांद्यांना जशा,
वसंतात नव्या पालव्या फुटतात…
तुझ्या आठवणींचे क्षण मला,
तसेच नव्याने भेटतात…

ग्रीष्मातील उन्हाचे,
जसे चटके सर्वांगी…
तुझ्या विरहात होरपळणार,
माझ मन ते अभागी….

मग वर्षा येते,
अन बेधुंद तो बरसतो….
माझ्या नयनातील पाऊस ,
तुझ्याचसाठी तरसतो…

शरदात त्याला,
कुठेतरी मग उसंत असते….
कस जगाव तुझ्याविना,
माझ्यासाठी एवढीच एक खंत असते….

हेमंत आणि शिशिरात,
सार ना कसं थंड थंड…
हृदयाने मात्र माझ्याशी,
तुझ्याचसाठी केलेलं नेहेमीचच एक बंड….

आता हे ऋतुचक्र,
सदैव असच चालायचं…
तुझ्याशी म्हणून,
माझ्याशीच मी किती किती मग बोलायच??

– अमर ढेंबरे

Walking

गळाभेट

अल्लडशा कोण्या क्षणी,
तुझी नी माझी गळाभेट व्हावी…
तळमळनाऱ्या दोन हृदयांची,
कडकडून भेट  …अगदी थेट व्हावी….
– अमर ढेंबरे

 

तूच आहेस….

तूच आहे स्वप्नांच्या अंगणी बागडणारी,
जागेपणी स्व्प्नावणारी तूच आहेस….
वेड असतं प्रेम !!  समजावणारी तूच,
अन प्रेमात वेडावणारी तूच आहेस…
तूच भरलेली आहेस जीवनात माझ्या,
अन मनात भरून उरलेलीही तूच आहेस….
– अमर ढेंबरे