जबाबदार

फुलांना शोषत तर फुलपाखरूही,
वेडा भ्रमर तो आवाज करतो…

आपणही कसे ना,
फक्त त्यालाच जबाबदार धरतो…

© अमर

तुझ्या विरहाचे भयानक प्रसंग

आठवतोय,
ते भयानक प्रसंग, तुझ्या विरहाचे,
माझ्या हळव्या मनावर गुदरलेले….

सावरतोय,
कसातरी स्वत:ला,
अस्वस्थ मन तरीही भेदरलेले….

– अमर ढेंबरे

जगुयात….

बस झाली आता सारी दु:खे,
चल नवी स्वप्ने बघुयात….
बस झाल अस कुढने,
आणि उगाच रडणे….
चल जरा तू…
आता एक नव आयुष्य जगुयात….
– अमर ढेंबरे