स्वप्ने तुटण्याचे भास झाले की….

कधी स्वप्ने तुटण्याचे भास झाले की,
मनात भावनांचा गलका होतो…

शांतच राहायचं असत मला,
पण माझा चेहरा,
नेमका त्याचवेळी बोलका होतो…

– अमर ढेंबरे

तुझ्या विरहाचे भयानक प्रसंग

आठवतोय,
ते भयानक प्रसंग, तुझ्या विरहाचे,
माझ्या हळव्या मनावर गुदरलेले….

सावरतोय,
कसातरी स्वत:ला,
अस्वस्थ मन तरीही भेदरलेले….

– अमर ढेंबरे

तुझ्याविना…

तुझ्याविना…
एका एका पावलाच अंतरही,
मैलाप्रमाणे भासत आहे…

तुझ्याविना…
जाणवतोय युगासारखा एक एक क्षण,
अस्वस्थ गात्रे आणि अत्यवस्थ माझ मन…

असंख्यांनी सजलेले रस्तेही तुझ्याविना सुने सुने,
जळणार माझ मन अन होरपळलेली माझी स्वप्ने…

खरच……
ओळखीचं या जगात आता काहीच भासेना…
तुझ्याविना….

श्वासानीही का मग स्पंदाव,
मनानेही आता कशास भुलाव….?

तुझ्याशिवाय, नयनांनी आता कुणा पहाव?
आसवांनी मात्र आता असच वाहाव…
आसवांनी मात्र आता असच वाहाव…

तूच सांग आता,
जगावं तर मग का जगावं….

सांग ना मला….
तुझ्याविना…कुठे मी जाव…?? काय मी कराव ??

– अमर ढेंबरे